कोमट पाणी पिण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणी हे जीवन आहे. पाण्याविना जगणं अशक्यच, हे सर्वांना माहिती आहे. पाणी हे आपली फक्त तहानच भागवत नाही, तर आपल्या शरीराच्या विकासासाठीची अनेक महत्वाच्या भूमिका सुद्धा बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यायला हवे. थंड पाण्यापेक्षाही कोमट पाणी शरीरासाठी अधिक लाभदायक असते, हे तुम्हाला माहित आहे का? आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती सांगणार आहोत.

1. आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल तर गरम पाणी पिणे कधीही चांगले. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पिणे महत्वाचे आहे.

2. तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. साधी सर्दी असेल तर कोमट पाण्याने आराम मिळतो.

3. महिलांना मासिक पाळीच्यावेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा थंड पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी प्या. त्यामुळे पोट दुखीवर आराम मिळतो.

4. कोमट पाण्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्धपणा दूर होतो. कोमट पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. त्यामुळे शरीरातील अशुद्धी घामातून बाहेर पडण्यास मदत होते.

5. कोमट पाणी पिण्यामुळे वाढते वय लवकर लक्षात येत नाही. याचे कारण की कोमट पाण्यामुळे अशुद्धपणा बाहेर पडतो. त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही.

6. कोमट पाण्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पिंपल्सची समस्याही दूर होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्यावाढीसाठी कोमट पाणी पिणे महत्वाचे आहे.

7. कोमट पाणी पिण्यामुळे पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे गॅसची समस्या दूर होते. किंवा गॅस निर्माण होत नाही.

8. आपले वजन नियंत्रणात राहते.

9. शरीर लवचिक बनण्यास मदत होते.

10. दररोज कोमट पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

असे प्यावे पाणी –

पाणी 10 मिनिट गरम करून घ्यावे. त्यानंतर थोडा वेळ गार होऊन द्यावे, नंतर हे पाणी पिल्याने तुम्हाला वरील फायचे दिसून येतील. कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना आकाश कोल्हे यांनी ही माहिती दिली.