डीएसके प्रकरणातील ठेवीदाराची आत्महत्या

309

बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत पाच वर्षांपूर्वी गुंतवलेले पैसे परत न मिळाल्याने एका ज्येष्ठ ठेवीदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी मुंढवा परिसरात ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. तानाजी गणपत कोरके (60) असे आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरके यांनी 2014 साली कुलकर्णी यांच्या कंपनीत चार लाख रुपयांची ठेक ठेकली होती. ठेवीची मुदत 2017मध्ये संपली. यानंतर त्यांना मुद्दल आणि त्याचे व्याज मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यांना पैसे मिळाले नाहीत. मुलीच्या लग्नासाठी कोरके यांना पैशाची गरज भासू लागली. मात्र पैसे मिळत नसल्यामुळे त्यांना नैराश्य आले होते. यातूनच कोररे यांनी गुरुवारी रात्री घरातील सर्व जण झोपल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच मुंढका पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या