दहशतवाद्यांची मदत करणाऱ्या राष्ट्रपती पदक विजेत्या डीएसपीची पोलीस दलातून हकालपट्टी

1067

हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसह अटक करण्यात आलेले आरोपी डीएसपी दविंदर सिंग यांची राज्य पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. डीएसपी दविंदर सिंग यांच्याविरोधातील सर्व प्रकरणेही एआयएकडे देण्यात आली आहे. तसेच दविंदर सिंग हे कधीपासून दहशतवाद्यांच्या संपर्कात होते याचाही अधिकारी शोध घेत आहेत.

जम्मू कश्मीरमध्ये शनिवारी हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांसह डीएसपी दविंदर सिंग या पोलीस अधिकार्‍यालाही अटक करण्यात आली होती. दविंदर सिंग यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मानही झाला होता. दविंदर सिंग यांनी हिज्बुलच्या दहशतवाद्यांना आसरा दिल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मंगळवारी त्यांची पोलीस दलाच्या सर्व सेवांमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

जम्मू कश्मीरमध्ये हिजबूलचा टॉपचा कमांडर ठार

मोठ्या कालावधीपासून दहशतवाद्यांच्या संपर्कात
अटकेनंतर जम्मू-कश्मीर पोलिसांनी डीएसपी दविंदर सिंग यांची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक चौकशीमध्ये ते बऱ्याच कालावधीपासून दहशतवाद्यांच्या संपर्कात होते हे उघड झाले आहे. 2018 मध्येही ते हिज्बुलच्या दहशतवाद्यांना घेऊन जम्मू-कश्मीरला आले होते. दविंदर आपल्या घरात दहशवाद्यांना आसरा देत होते हे देखील पोलीस चौकशीच उघड झाले. पोलीस सध्या दविंदर यांच्यासह अटक केलेला हिज्बुलचा दहशतवादी नवीदचीही चौकशी कत आहे. या दहशतवाद्यांनी दिल्ली, चंदीगड आणि पंजाबमध्ये हल्ल्याची योजना आखली होती.

dsp-devinder-singh1

13 जानेवारीला अटक
शनिवारी जम्मू कश्मीर महामार्गावर मीर बाजारमध्ये दविंदर सिंगला दहशतावाद्यांसोबत पकडले. त्या दिवशी दहशतवाद्यांनी दविंदरच्या घरीच रात्रीचे जेवण घेतले. तसेच या दहशतवाद्यांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवण्याची जवाबदारी दविंदरकडे होती. दविंदरनेच या दहशतवाद्यांना अपाल्या घरी आसारा दिला होता. पोलिसांनी दविंदरच्या बादामी भागात जेव्हा छापा टाकला तेव्हा पोलिसांना एके 47 दोन पिस्तुल सापडल्या.  दविंदरकडे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती होती. दविंदरकडे जम्मू कश्मीरच्या गाडीगढमध्ये एक घर आहे. तिथे त्याचे काही नातेवाईक राहतात. दक्षिण कश्मीरमध्ये त्याचे घर आहे. तसेच श्रीनगरमध्ये बादामी भागातही त्याचे एक आलिशान घर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या