
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या चांगलीच आटोक्यात आल्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी 4 हजार 019 दिवसांवर पोहोचला आहे. शिवाय 20 हजार 846 चाचण्यांमध्ये फक्त 119 बाधित आढळले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एक मृत्यू झाला आहे.
मुंबईत आढळलेल्या रुग्णांमधील 21 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यातील 10 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. मुंबईत गेल्या 24 तासांत 257 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आता 1088 सक्रिय रुग्ण आहेत.
























































