चमीरा, हसरंगाचे स्वप्न भंगले, श्रीलंकेचा वर्ल्ड कप संघ जाहीर, शनाकाकडेच कर्णधारपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीरा आणि अष्टपैलू वनींदु हसरंगा यांचे आगामी आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. या दोन्ही गोलंदाजांना आपल्या दुखापतीमुळे श्रीलंकेच्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळालेले नाही. मात्र महीश तीक्षणा, दिलशान मदुशंका आणि लाहिरू कुमारा या अनफिट असलेल्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच प्रमोद मदुशन, बिनुरा फर्नांडो आणि चमिका करुणारत्ने यांना राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

काही महत्त्वांच्या खेळाडूंना दुखापती झाल्यामुळे श्रीलंकेने आपला वर्ल्ड कप जाहीर करण्यात विलंब केला. अखेर आज त्यांनी आपला संघ जाहीर करताना चमीरा आणि हसरंगा संघात नसल्याचे सांगितले. या दोघांची अनुपस्थिती श्रीलंकेला प्रकर्षाने जाणवेल यात तीळमात्र शंका नाही. पण जो संघ मिळाला आहे त्यांच्यासह सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आव्हान दासून शनाकापुढे असेल. हसरंगाची दुखापत बरी होण्यासाठी आणखी किती काळ लागणार याची कल्पना नसल्यामुळे त्याचे नाव वगळण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जर तो फिट झाला तर संघातील एखाद्या जखमी खेळाडूच्या जागी त्याची निवड केली जाईल, असेही श्रीलंकन क्रिकेटने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

n श्रीलंका संघ ः दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका (कर्णधार), धनंजया डिसिल्व्हा, चरिथ असलंका, दुषण हेमंथा, लाहिरू कुमारा, मथीशा पथिराणा, दिलशान मदुशंका, कसुन रजीथा, महीश तीक्षणा, दुनिथ वेल्लालागे.