
सामना ऑनलाईन । हैदराबाद
हिंदुस्थानची सर्वात जलद महिला धावपटू द्युती चंद हिने आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. ”माझी बहीण मला सतत ब्लॅकमेल करत होती. तिने माझ्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली होती. तसेच एकदा तिने मला मारहाणही केली. त्याबाबत मी पोलिसात तक्रारही केली आहे. तिच्या या ब्लॅकमेलींगमुळेच मला माझे समलिंगी संबंध जाहीर करावे लागले.” असे द्युतीने पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
Had to come out as sister was blackmailing me for money, says Dutee Chand
Read @ANI Story | https://t.co/8obyHVbX9a pic.twitter.com/wAVr0JbUgR
— ANI Digital (@ani_digital) May 21, 2019
द्युती चंदने शनिवारी मैत्रिणीसोबत समलिंगी संबंध असल्याचा खुलासा करून खळबळ उडवली होती. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रिणीशी आपले खूप दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याचे द्युतीने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, मात्र तिने मैत्रीणीची ओळख सांगण्यास नकार दिला. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी घरातून हकालपट्टी करण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर द्युतीने घरच्यांच्या दबावासमोर झुकणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.
























































