ई वॉलेटच्या नावाखाली फिजिओथेरपिस्टची फसवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ई वॉलेटच्या नावाखाली फिजिओथेरपिस्टची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक प्रकरणी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तक्रारदार हे वाशी येथे राहत असून ते फिजिओथेरपिस्ट आहेत. दहा दिवसांपूर्वी ते चिंचपोकळी स्थानकातून प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान त्यांना मोबाईल वर एक मेसेज आला. ई वॉलेट बंद होणार असल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले. जर ई वॉलेट पुन्हा सुरु करायचे असल्यास क्विक स्पोर्ट ऍप्स डाऊन लोड करण्यास सांगितले. ऍप्समधील फॉर्म भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यावर त्यांना आयडी शेअर करण्यास सांगितले. त्याच दरम्यान त्याच्या खात्यातून पैसे गेले. पैसे गेल्याबाबत तक्रारदारांनी फोन करून विचारणा केली. तेव्हा ते पैसे परत ई वॉलेटमध्ये जमा होतील अशा भूलथापा मारल्या. काही वेळाने तक्रारदाराच्या खात्यातून 2 लाख रुपये काढण्यात आले. अचानक पैसे गेल्याने तक्रारदारांनी पुन्हा त्या नंबरवर फोन केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दादर रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली.