
मे महिन्यात ई-वे बिल जनरेशनचे प्रमाण 30 टक्क्यांनी घटले. एप्रिल महिन्यात 5.88 कोटी ई-वे बिल जनरेट झाली होती. मात्र मे महिन्यात 3.99 कोटी ई-वे बिल जनरेट झाली. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर व्यापार हळूहळू रुळावर आला आहे. जून महिन्यात 5.5 कोटी ई-वे बिल जनरेट झाले. 20 जूनपासून आतापर्यंत ई-वे बिलचा आकडा 20 लाखांच्या पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी एप्रिलच्या सुरुवातीच्या दोन आठवडय़ांत ही पातळी होती.

























































