Breaking: दिल्ली आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली आणि आसपासच्या भागात गुरुवारी दुपारच्यावेळात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं वृत्त आहे. दिल्ली, एनसीआरसह पंजाब आणि जम्मू-कश्मीरची धरती पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरली आहे. भूकंपामुळे नागरिकांनी घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर धाव घेतली. सध्या यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील फेजाबाद येथे असल्याचे आणि रिश्टर स्केलवर याची तीव्रता 6.2 असल्याची माहिती समोर आली आहे.