कच्चा कांदा खा, गंभीर आजारांना दूर ठेवा…!

कच्चा कांदा खाल्ल्याने तोंडाला कांद्याचा वास येतो. त्यामुळे बरेचसे लोक कच्चा कांदा खाणे टाळतात, पण काही लोकांचे जेवण कांद्याशिवाय पूर्णच होत नाही. अशा प्रकारे अन्नाची चव वाढवणाऱ्या कांद्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असल्यामुळे तो आरोग्यदायीही आहे, मात्र तो कोणत्या वेळी आणि कसा खायला हवा ते आता पाहूया.

उन्हाळ्यात जेवणासोबत कच्चा कांदा खावा. उन्हाची झळ लागल्याने होणारे सर्व प्रकारचे आजार कच्चा कांदा खाल्ल्याने होत नाहीत. अँण्टीबॅक्टेरियल गुणधर्म कांद्यामध्ये जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे रोज सकाळी रिकाम्यापोटी कांदा खाल्ला तर रोगप्रतिकारशक्ती वाढून पचनक्रिया उत्तम राहते. पचनक्रियेशी संबंधित इतरही अनेक आजार टाळता येतात. कांदा शिजवल्यानंतर त्यातील काही गुणधर्म नष्ट होतात त्यामुळे कच्चा कांदा खाणे फायदेशीर ठरते.

कच्च्या कांद्यामध्ये फ्लॅवनॉयडस् असतात ते शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. त्यामुळे रक्त पातळ व्हायला मदत होते. यामुळे ह्रदयविकार आणि स्ट्रोक येण्यासारख्या गंभीर आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.

कांद्यामध्ये 25.3 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. कॅल्शियमची हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत आवश्यकता असते. याकरिता सलाडमध्ये कांद्याचा वापर करावा. जेणेकरून हाडे मजबूत होण्यास मदत होईल.

कांद्यातील अँण्टीऑक्सीडंट आणि अँण्टी कँन्सर प्रॉपर्टीज असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता वाढते.
काही वेळा अॅलर्जीमुळे श्वास घ्यायला त्रास होतो. ज्यांना अस्थम्याचा विकार आहे त्यांच्याकरिता कांदा गुणकारी ठरतो. कांद्यातील फ्लॅवनॉयड्समुळे दमा, अस्थमासारखे विकार असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यासाठी मदत होते.

मधुमेह असलेल्या रुग्णांकरिता कांदा अत्यंत गुणकारी आहे. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा फायदेशीर ठरतो. कांद्यात असणारे सल्फर शरीरात अँण्टीडायबिटीकप्रमाणे काम करते.

आपली प्रतिक्रिया द्या