रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी खा ‘हे’ फळ, रक्तातील साखरही राहील नियंत्रणात

dragon-fruit

कार्बोहायड्रेटस, डाएटरी फायबर, प्रथिने आणि आयर्न भरपूर प्रमाणात असलेले आरोग्यदायी फळ म्हणजे ‘ड्रॅगन फ्रूट’. अनेक पौष्टिक घटकांचा या फळामध्ये समावेश असतो. त्यामुळे अनेक आजार हे फळ खाल्ल्याने बरे व्हायला मदत होते. हल्ली ड्रॅगन फ्रूट बाजारात सहज विकत मिळते. यामध्ये प्रथिने 3 ग्रॅम, कार्ब्स 29 ग्रॅम, फायबर 7 ग्रॅम, आर्यनचे प्रमाण 8 टक्के आणि कॅलरीजही असतात. दीर्घ काळ चालणाऱ्या आजारपणात हे फळ खाल्ल्याने विशेष फायदा होतो. जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे.

ड्रॅगन फ्रूटमध्ये अॅंण्टीऑक्सिडंटस्, फ्लेवोनॉईड, फोलिक अॅसिड, बीटासियानिन ही तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे फ्री रेडिकल्सपासून रक्षण होते. ड्रॅगन फ्रूट फॅट फ्री आणि फायबरयुक्त असते. त्यामुळे ते खाल्ल्याने जास्त वेळ पोट भरलेले राहते आणि भूकही लागत नाही. याचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहायला मदत होते. इन्सुलिन आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी ड्रॅगन फ्रूट खाणे फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

– शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जीवनसत्त्व सी आणि कॅरोटिनॉइड हे घटक महत्त्वाचे असतात. हे दोन्ही अँण्टीऑक्सिडंट ड्रॅगन फ्रूटमधून मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात ड्रॅगन फ्रूटचा समावेश करणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढल्यास आजार होण्याचा धोका टळतो.

– या फळामध्ये खूप फाइबर असल्याने पोट साफ राहते. रक्त पुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी राहते. म्हणजे डायिबटीस धोका टळला. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदयविकाराचा धोका रहात नाही तसेच बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदयविकारावर मात करता येते.

– ड्रॅगन फ्रूट खाल्ल्याने सौंदर्य वाढते. ह्या फळाने फेस मास्क, केसांचा मास्क बनवता येतो. ड्रॅगन फ्रूटमुळे चेहऱ्यावरचे फोड, एक्ने, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा इत्यादी रोगांवर हे फळ म्हणजे रामबाण उपाय आहे. हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात.