
बेटिंग अॅप प्रकरणात चौकशीसाठी आज हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपट्टू सुरेश रैना हा ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या मुख्यालयात हजर झाला. दिल्लीतील ईडी मुख्यालयात त्याची सकाळी 11 वाजल्यापासून चौकशी करण्यात आली. 1 एक्सबेट या ऑनलाइन बेटिंग अॅपच्या जाहिरातीसंदर्भात चौकशीसाठी त्याला बोलावण्यात आले. या अॅपचा रैनाच ब्रँड अॅम्बेसेडर आहे. संबंधित अॅपच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे.