भाजप नेते जे. एम. म्हात्रे यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

अलीकडेच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केलेले प्रख्यात ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांच्या पनवेल येथील निवासस्थानी आज सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. राखीव वन जमीन बेकायदेशीररित्या संपादित करून ती नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडियाला (एनएचएआय) विकल्याप्रकरणी जे. एम. म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात सरकारची 50 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप म्हात्रे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, अवघ्या एका महिन्यापूर्वी जे. एम. म्हात्रे आणि त्यांचा मुलगा प्रीतम म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या छापेमारीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ईडीने ही कारवाई मंगळवारी सकाळी सुरू केली आहे. याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.