शिव ठाकरे, अब्दू रोजीक यांना ईडीचे समन्स

टीव्ही कलाकार आणि मराठी चित्रपट अभिनेता शिव ठाकरे आणि सोशल मीडिया इन्फ्लुन्सर, ‘बिग बॉस 16’ मधील स्पर्धक अब्दू रोजीक या दोघांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी समन्स पाठवले आहे.

कथित ड्रग माफिया अली असगर शिराजीसंबंधित कथित मनी लाँडरिंगप्रकरणी नुकतीच अभिनेता शिव ठाकरेला ईडीने बोलावून चौकशी केली होती. याप्रकरणी साक्षीदार म्हणून शिव ठाकरेची साक्ष नोंदवण्यात आली होती. शिव ठाकरेशिवाय ईडीने ‘बिग बॉस 16’मधील स्पर्धक अब्दू रोजीकलाही चौकशीसाठी बोलावले आहे. अली असगर शिराजीने हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवली होती. या कंपनीने शिव ठाकरे आणि अब्दू रोजीकसह अनेक स्टार्टअप यांना फंडिंग पुरवल्याचा आरोप आहे. तसेच हसलर्स हॉस्पिटॅलिटीने ठाकरे चहा एन्ड स्नॅक्समध्येही मोठी गुंतवणूक केली होती. स्टार्टअप योजनेतून नार्को-फंडिंगच्या माध्यमातून पैसे कमावल्याचा आरोप आहे. अब्दू रोजीकने हसलर्स हॉस्पिटॅलिटी थ्रू हसलर्ससोबत पार्टनरशिपमध्ये बर्गर ब्रँड बुर्गिर सुरू केले. यात अली असगर शिराजीने गुंतवणूक केल्याचा आरोप आहे.