एकनाथ खडसे यांना कोरोनाचा संसर्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकनाथ खडसे यांची मुलगी व जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांना यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता एकनाथ खडसे यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खडसे जळगावममध्ये होते. कोरोनाचे निदान झाल्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनावर मात करीन

आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट मिळाला असून मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची तपासणी करून घ्यावी. माझी प्रकृती चांगली आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. कार्यकर्त्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. माझ्यावर योग्य उपचार होतील आणि आपण कोरोनावर मात करू असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.