एकनाथ खडसे यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

8779

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विधानभवानमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली.

तत्पूर्वी सोमवारी भाजपने पाडापाडीचे राजकारण केल्याचा आरोप करत दिल्लीत दाखल झालेल्या एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मंत्री शरद पवार यांचीही भेट घेतली.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

या भेटीपूर्वी त्यांनी पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवामध्ये पक्षातील लोकांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या हात असल्याचा केला होता आणि याचे पुरावे त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींसमोर ठेवले.

हे देखील वाचा – 

नागरिकता सुधारणा विधेयकात स्पष्टता आल्याशिवाय पाठिंबा नाही – उद्धव ठाकरे

आपली प्रतिक्रिया द्या