नागरिकता सुधारणा विधेयकात स्पष्टता आल्याशिवाय पाठिंबा नाही – उद्धव ठाकरे

9445

नागरिकता सुधारणा विधेयकातील अनेक बाबी अस्पष्ट आहेत. जोपर्यंत त्याबाबतची सत्यता आणि स्पष्टता होत नाही, तोपर्यंत शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या विधेयकामुळे देशातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असेल तर त्यांच्या मनातील संभ्रम दूर करणे गरजेचे आहे. देशातील नागरिकांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे या विधेयकात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत या विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्षाकडून जे काही आणले जाते, त्याच्या बाजूने मतदान करणे म्हणजेच देशभक्ती आणि त्याला विरोध करणे म्हणजे देशद्रोह या भ्रमातून सर्वांनी बाहेर यायला पाहिजे. लोकसभेमध्ये मांडलेल्या विधेयकात स्पष्टता दिसत नाही. शिवसेनेनी आपली भूमिका ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्ट केली आहे. अनेक प्रश्न देशासमोर आहेत. ते आम्ही सभागृहातही मांडले आहेत. तसेच सामनाच्या माध्यमातून जाहीरपणेही मांडले आहेत. ज्या काही सुधारणा आम्ही लोकसभेत सुचवल्या आहेत, राज्यसभेत विधेयक येताना त्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि विधेयकात अधिक स्पष्टता आली पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या