चंद्रपुरात बंडखोर शिंदेंचा पोस्टर जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात चंद्रपुरात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शहरातील तुकुम परिसरात कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिंदे यांचा फोटो जाळत निषेध नोंदवण्यात आला.

शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर चंद्रपुरातील शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. शिवसैनिक रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांविरोधात संताप व्यक्त करीत आहेत. त्याचे पडसाद शहरात ठिकठिकाणी उमटलेले दिसून आले. कामगार सेनेने बंडू हजारे यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात संताप व्यक्त केला. बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांना प्रेमाची ऊब देऊन त्यांना घडविले. शिवसेनेमुळे अनेकांना आमदारांना मंत्री पदावर पोहचण्याची संधी मिळाली. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य आम्ही शिवसैनिक कदापीही खपवून घेणार नाही, अशा बंडखोरांना चांगला धडा शिकवण्याचा इशारा बंडू हजारे यांनी निषेध व्यक्त करताना दिला. यावेळी आंदोलनात युवासेना उपजिल्हाप्रमुख कैलाश तेलतुंबडे, विधानसभा समनव्यक अमोल मेश्राम कामगार सेना शहर उपाध्यक्ष विशाल कावने, युवासैनिक मार्शल अडकीने, रिचर्ड रॉडरिक्स शेकडो व शिवसैनिक उपस्थित होते.