
दूरदर्शन, नाट्य, चित्रपट अभिनय क्षेत्रातील योगदानाबद्दल एकता कल्चरल अकादमीच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांना या वर्षीचा ‘एकता कला गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्यिक वैभव साटम, अभिनेत्री प्रज्ञा जाधव, पत्रकार विजय साखळकर, प्रसाद जोशी, शैक्षणिक योगदानाबद्दल विद्या प्रभू तर समीक्षक कमलाकर राऊत यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. समाजसेवेचे पुरस्कार प्रशांत देशमुख, हर्षद आचार्य, संदेश निकम, सतीशकुमार साळुंके, सूरज भोईर, चंद्रकांत करंबळे, मगन सोलंकी, अश्विनी कांबळे, सोमनाथ ओझर्डे यांना जाहीर झाले आहेत. कवी अजय कांडर, हिंदी साहित्यिक रमेश यादव, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार यांच्या निवड समितीने काम पाहिले.
8 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी 4 वाजता गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे एकता महोत्सवात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. एकता संस्थेचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी याची घोषणा केली.
























































