
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
‘ईव्हीएम’मध्ये घोटाळा करून भाजपने 2014ची लोकसभा निवडणूक जिंकली, असा दावा करून खळबळ उडवून देणारा अमेरिकन हॅकर सय्यद शुजाविरुद्ध निवडणूक आयोगाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. शुजावर एफआयआर नोंदविण्यात आला आहे.
कपिल सिब्बल तेथे का होते? – प्रसाद
हॅकर शुजाची पत्रकार परिषद काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी प्रायोजित होती. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी काँग्रेस नेते कपिल सिब्बल तेथे का होते, असा सवाल केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
खासगी कामासाठी गेलो होतो लंडनला
सय्यद शुजाच्या पत्रकार परिषदेमागे काँग्रेस होती असा आरोप भाजपने करताच काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. मी खासगी कामासाठी लंडनला गेलो होतो. मला या पत्रकार परिषदेसाठी बोलवले होते, त्यामुळे मी तेथे गेलो असे त्यांनी म्हटले आहे.






























































