
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना आता थेट ऑनलाइन तक्रार करता येणार आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ हे नवे मोबाईल अॅप आणले आहे. हे अॅप मतदारांसाठी प्रभावी अस्त्र ठरणार असून या अॅपच्या माध्यमातून व्हिडीओ किंवा छायाचित्र पाठवता येणार आहे.
लोकसभा निवडणूक मतदानासाठी मतदारांची सुविधा आणि निवडणूक निर्भय, मुक्त, पारदर्शीपणे पार पडण्यासाठी निवडणूक आयोग या वेळेस डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे. त्यासाठी ‘सी व्हिजिल’ हे नवे मोबाईल अॅप आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या ऍण्ड्रॉइड स्मार्टफोनद्वारे या अॅपच्या माध्यमातून तक्रार करता येणार आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराला या अॅपमध्ये आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मतदारांना पैशांचे वाटप, मद्य, अमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा कापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत काहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या तक्रारींचे छायाचित्रे अथवा व्हिडीओज् पुरावा म्हणून थेट अपलोड करण्याची सुविधा आहे.
अशी करा तक्रार…
- आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिकाने त्या घटनेचे छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड करावा.
- जीपीएस प्रणालीद्वारे स्वयंचलित स्थान मॅपिंगसह फोटो अथवा व्हिडीओ या अॅपवर अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर एक युनिक आयडी प्राप्त होईल.
- तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होईल. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर तसा संदेश प्राप्त होईल.
- याशिकाय नागरिकांनी तक्रारी नोंदकिण्यासाठी भारत निकडणूक आयोगाच्या https://eci.nic.in या मुख्य संकेतस्थळाचा वापर करता येईल. 1800111950 तसेच 1950 या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
दिव्यांगांसाठी अॅप
दिव्यांगांची मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी आदी सोयी उपलब्ध करून घेण्यासाठी पीडब्लूडी अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. पीडब्लूडी आणि ‘सी व्हिजिल’ हे दोन्ही मोबाईल अॅप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत.




























































