चार राज्यासह तेलंगणाच्या निवडणुका नाहीत; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोरामच्या निवडणुकांसह तेलंगाणा विधानसभेच्या निवडणुका घेण्याचे वृत्त निवडणूक आयोगाने फेटाळून लावले आहे. याबाबत काही प्रसारमाध्यमांनी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसह तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका होण्याचे वृत्त दिले होते. हे वृत्त खोडसाळपणाचे असून त्यात तथ्य नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. चार राज्यांसह तेलंगणाच्याही निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केल्याचे प्रसारमाध्यमांनी वृत्तात म्हटले होते. या निवडणुका एकत्र घेण्याचे वृत्त प्रसारमाध्यमांच्या शक्यतेवर अवलंबून असल्याचे तेलंगणातील मुख्य निवडणूक अधिकारी रजत कुमार यांनी सांगितले.

तेलंगणाचे राज्यपाल नरसिंहन यांनी ६ सप्टेंबरला तेलंगणा विधानसभा बरखास्त केली होती. त्यानंतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबत तेलंगणा विधानसभेच्याही निवडणुका घेण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ही शक्यता निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. तेलंगणा विधानसभा बरखास्त झाल्यानंतर तेलंगणा राष्ट्रीय समितीने ( टीआरएस) 105 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. विधानसभा बरखास्त झाल्यानंतर के. चंदशेखर राव काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत.