
पश्चिम बंगालमधील फालता मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. या मतदार संघातील सर्व 285 मतदान पेंद्रांवर 21 मे रोजी फेरमतदान होईल आणि 24 मे रोजी मतमोजणी होईल. या मतदारसंघात 29 मे रोजी मतदान झाले होते. त्यावेळी काही ठिकाणी ईव्हीएममध्ये गडबड आढळली होती. तसेच हिंसाचार झाला होता. याबाबतच्या तक्रारीनंतर आयोगाने फेरमतदानाचा निर्णय घेतला आहे.



























































