
देवगड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सायंकाळपर्यंत 62%एवढे मतदान होऊन 35,954 मतदारांपैकी 20,298 मतदारांनी मतदान केले. पहिल्या दोन तासांत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 19% मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर 11.30 वाजेपर्यंत 34.14 %एवढे मतदान झाले. एकूण मतदार35,594 पैकी 12,276 मतदारांनी मतदान केले. यात 6,772 पुरुष व स्त्री मतदार 5,504 मतदारांनी मतदान केले.
दुपारी 1.30 पर्यंत एकूण पुरुष मतदार 9,716 व स्त्री मतदार 8,746 एकूण 18,462 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला, तर त्यानंतर दुपारी 3.30 पर्यंत एकूण 20,298 एवढ्या मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 10,581 आणि महिला मतदार 9717 यांचा समावेश आहे. यामुळे आता पंचायत समिती सदस्य तसेच दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झाले आहे.
रविवारी सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला. तालुक्यात एकूण 35,954 मतदार असून यापैकी 5502 एवढ्या मतदारांनी मतदान केले. यात पुरुष मतदार 3,716 तर महिला मतदात 1,786 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. देवगड तहसीलदार स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, निवासी नायब तहसीलदार विवेक शेट यांच्या समवेत 6 क्षेत्रीय अधिकारी व अन्य कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुपारपर्यंत सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.































































