
पेट्रोल, डिजेलचे भाव वाढल्याने स्वस्तात मस्त पर्याय म्हणून लोकांची इलेक्ट्रिक कार, बाईक्सना पसंती मिळतेय. म्हणूनच दिल्ली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी भन्नाट इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली आहे.
ही बाईक अवघ्या वीस पैशांत एक किमी अंतर कापणार आहे. या विद्यार्थ्यांनी गेलियोस मोबिलिटी स्टार्टअप अंतर्गत ‘होप’ ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉंच केली आहे. या स्कूटरसोबत पोर्टेबल चार्जर आणि आयर्न बॅटरी मिळते. ती घरी नेऊन चार्ज करता येते. बॅटरी चार तासांत पूर्ण चार्ज होते. घरातील सामान्य सॉकेटद्वारे बॅटरी चार्ज करता येणार आहे.
50 आणि 75 किमी रेंज अशा दोन पर्यायांमध्ये स्कूटर ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किमी एवढा आहे. महत्त्वाचे म्हणजे ही स्कूटर चालविण्यासाठी लायसन्सची किंवा रेजिस्ट्रेशनची गरज नाही. स्कूटरला पॅडलदेखील देण्यात आले आहे.



























































