एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने दोन दिवसांपूर्वी ऐतिहासिक उड्डाण केले. हे जगातील पहिले खासगी स्पेसवॉक आहे. उड्डाण अंतराळात पोहोचताच दोन अंतराळवीरांनी पोलारिस डॉन मिशनमध्ये पृथ्वीपासून जवळपास 700 किलोमीटर दूर अंतरावर स्पेसवॉक केला. चार जणांपैकी दोन अंतराळवीर मिशन कमांडर जेरेड आइसेकमन आणि मिशन स्पेशलिस्ट सारा गिलिस यांनी जवळपास 10 मिनिटे स्पेसवॉक केला. याची छायाचित्रेसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. स्पेसवॉकच्या वेळी अंतराळ यानाचा वेग 25 हजार किमी होता. 10 सप्टेंबरला पोलारिस डॉन मिशन लाँच झाले असून या मिशनअंतर्गत 4 अंतराळवीर अंतराळात दाखल झाले आहेत. 5 दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीर ज्या कक्षेत गेले आहेत त्या कक्षेला गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ कोणत्याही अंतराळवीराने भेट दिलेली नाही.