जम्मू कश्मीरमध्ये चकमक, हिज्बुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दोन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन संघटनेचे असल्याचे समोर आले आहे.

आज जम्मू कश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत हिजबुल  मुजाहिदीनचा जिल्हा कमांडर सिराज मौलवी आणि यावर भट हे दोन दहशतवादी मारले गेले. सुरक्षा दलाला त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळला आहे.

सिराज मौलवी हा 2016 पासून दहशतवादी कारवाया करत आहे. त्याने अनेक निष्पाप नागरिकांचा जीव घेतला होता. कुलगामच्या चावलगाम भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हा सुरक्षा दलाने इथे शोधमोहीम राबवली, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणी चकमक उडाली.

गुरूवारी सांयकाळच्या सुमारास श्रीनगरच्या बेमिना भागात चकमक उडाली होती. तेव्हा एक दहशतवादी मारला गेला होता, त्याच्याकडून एक एक 47 बंदूक जप्त करण्यात आली होती.