नीरव मोदी, मेहुल चोक्सीची साडेतीन हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीचा अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करून या दोघांची तीन हजार ५०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने बुधवारी विशेष पीएमएलए न्यायालयात दाखल केला असून या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

याच प्रकारचा अर्ज ईडीने गेल्याच महिन्यात मद्यसम्राट विजय मल्ल्याविरुद्धही दाखल केला होता. त्या अर्जाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात मल्ल्याविरुद्ध समन्स बजावून त्याला २७ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर होण्यास सांगितले आहे.