ईडीकडून चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांची कोटय़वधीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. शारदा चीट फंड घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. याचबरोर इतरही अनेक मान्यवरांच्या जवळच्या नातेवाईकांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम, सीपीएमचे माजी आमदार देबेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी मंत्री अंजान दत्ता यांच्या पंपनीची एकूण सहा कोटींपेक्षा अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीने माध्यमांना दिली.