ENG vs IND test match कोहली, रहाणेची झुंजार अर्धशतकी खेळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंड आणि हिंदुस्थानमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या हिंदुस्थानी संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मात्र, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतके करून संघाचा डाव सावरला आहे.

त्यामुळे हे दोघे मैदानात टिकल्यास ते मोठी भागीदारी करून इंग्लंडपुढे धावसंख्येचे मोठे आव्हान उभे करू शकतात.

पाच सामन्यांच्या मालिकेत दोन सामने जिंकून इंग्लंडने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी ही कसोटी जिंकणे हिंदुस्थानी संघाला आवश्यक आहे. त्यामुळे जिकंण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरला होता. मात्र, संघाची फारशी चांगली सुरुवात झाली नाही. संघाच्या ६० धावा झाल्या असताना धवन झेलबाद झाला. त्यानंतर ६५ धावा असताना राहूल पायचीत झाला. संघाच्या ८२ धावा झाला असताना पुजारा झेलबाद झाला.

संघाचे तीन फलंदाज झटपट तंबूत परतल्याने संघाची बिकट अवस्था झाली होती. मात्र, त्यानंतर कोहली आणि रहाणे यांनी मैदनावर टिकून राहत अर्धशतके झळकावल्याने हिंदुस्थानी संघाचा डाव सावरला आहे. आता या दोघांनी मोठी भागीदारी उभी करण्याची अपेक्षा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.