इंजिनीअरला ठेकेदाराकडून मारहाण, एफआयआर नाही

पालिकेचे अभियंता रंजन बागवे यांना पे ऍण्ड पार्कचा ठेकेदार अब्दुल अन्कर सत्तार याने आठवडाभरापूर्व बेदम मारहाण केली असताना पोलिसांकडून अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. याचा निषेध करीत मारहाण करणाऱया ठेकेदाराला अटक करा, अशी मागणी करीत आज पालिकेच्या सर्व 24 वॉर्डमध्ये अभियंत्यांनी एक ते दोन तास ‘काम बंद’ आंदोलन केले.

राज्याचे मुख्यमंत्री ‘डी’ किभागामध्ये स्कच्छतेची पहाणी करण्यासाठी 2 डिसेंबर रोजी येणार होते. याच्या नियोजनासाठी मनुष्यबळ अपुरे असल्यामुळे ‘ई’ किभागातून सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता, कनिष्ठ अभियंता आणि कामगार यांना घेऊन तुळशीकाडी ‘डी’ किभागात गेले होते. यावेळी पार्किंगच्या ठिकाणी सहाय्यक अभियंता रंजन बागके गाडी पार्क करीत असताना रंजन बागके आणि त्यांचा वाहनचालक यांना पे ऍण्ड पार्कचा कंत्राटदार अब्दुल अन्कर शेख यांनी बेदम मारहाण केली. याच्या निषेधार्थ आणि संबधित कंत्राटदाराला अटक करण्याच्या मागणीही 24 किभागांतील अभियंते आणि ‘ई’ किभागातील सर्क खात्यातील कामगारांच्या वतीने आंदोलन करण्यात आल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधक यांनी सांगितले. यावेळी म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष रमेश भुतेकर-देशमुख, सरचिटणीस कामन ककिस्कर, सहा. सरचिटणीस प्रफुल्लता दळकी, कार्याध्यक्ष नकनाथ घाडगे, राजेंद्र जोशी उपस्थित होते.