इंग्लंडचा मालिका विजय, दक्षिण आफ्रिकेचा मायदेशात पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओएन मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंडच्या क्रिकेट संघाने वन डे वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला. आता याच इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिकेत टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. डेव्हीड मालनच्या 40 चेंडूंमधील 55 धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या क्रिकेट संघाने रविवारी झालेल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेवर 4 गडी राखून दमदार विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. डेव्हीड मालनचीच सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या 147 धावांचा पाठलाग करणाऱया इंग्लंडने सहा गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. डेव्हीड मालनने 40 चेंडूंत एक षटकार व सात चौकारांसह 55 धावांची खेळी साकारत इंग्लंडच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ओएन मॉर्गनने नाबाद 26 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेज शम्सीने तीन, लुंगी एनगिडीने दोन गडी बाद केले.

दरम्यान, याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंपून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विण्टॉन डी कॉकने 30 धावांची, रासी वॅन डर डय़ुसेनने नाबाद 25 धावांची आणि जॉर्ज लिंडेने 29 धावांची खेळी केली. पण दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांना 6 बाद 146 धावाच करता आल्या. फिरकी गोलंदाज आदील रशीने 23 धावा देत दोन फलंदाज बाद केले.