इंग्लंडमध्ये कोरोनामुळे हिंदुस्थानी वंशाच्या पिता पुत्रीचा एकाच दिवशी मृत्यू

2746

कोरोना व्हायरसने इंग्लंडमध्ये देखील थैमान घातले आहे. आतापर्यंत या देशात सातशेहून अधिक लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. यात एका हिंदुस्थानी पितापुत्राचा देखील समावेश असून दुर्दैवाने या दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. सुधीर शर्मा (61) व पुजा शर्मा (33) असे त्या पिता पुत्रीचे नाव आहे. दरम्यान

सुधीर शर्मा हे हेथ्रो टर्मिनलमध्ये कामाला होते तर त्यांची मुलगी पुजाचे मेडिकलचे दुकान होते. हे दोघेही इंग्लंडमधील इस्ट सुसेक्समध्ये राहायचे. शर्मा यांची पत्नी आता एकटी राहिली असून त्यांना त्यांचे पती व मुलीचे अंतिम दर्शन देखील घेता आले नाही. इंग्लंडमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 14,543 पर्यंत पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा 759 झाला आहे. गेल्या चोवीस तासात इंग्लंडमध्ये 181 जणांचा मृत्यू झाला

आपली प्रतिक्रिया द्या