
ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण सुरू झाले असले तरी कोरोनाचा कहर कमी झालेला नाही. त्यामुळे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी मार्चपर्यंत देशभरात कडक लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. हा लॉकडाऊन सात आठवडय़ाचा असणार आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 75 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा लाखांच्या घरात पोहोचू नये यासाठी ब्रिटन सरकारने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली असून 22 फेब्रुवारीपर्यंत नियमांत शिथिलता येण्याची शक्यता कमीच आहे. फेब्रुवारीपर्यंत शाळादेखील बंदच राहणार असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन पंतप्रधान जॉनसन यांनी केले आहे. 4 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सर्वसाधारण दुकाने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
दरम्यान न्यूयॉर्पमध्येही कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले असून गर्व्हनर एंडर्य़ू क्यूमो यांनी याला दुजोरा दिला आहे. याआधी कोलोराडो आणि कॅलिफोर्नियातही कोरोनाच्या नव्या विषाणूची प्रकरणे समोर आली आहेत.



























































