युरोपीयन संसदेचा CAA विरोधात ठराव, अंतर्गत प्रश्न असल्याचा हिंदुस्थानची भूमिका

1229

युरोपीयन संसदेने हिंदुस्थानच्या नागरिकत्व सुधारिक कायद्याविरोधात ठराव मांडला आहे. या ठरावावर संसदेत चर्चा आणि मतदान होणार आहे. परंतु हा देशा अंतर्गत प्रश्न असल्याची भूमिकाहिंदुस्थानने घेतली आहे.

युरोपीयन युनाटेड लेफ्ट, नॉर्डिक ग्रीन लेफ्ट या पक्षांनी CAA विरोधात ठराव मांडला आहे. बुधवारी या ठरावावर चर्चा होऊन मतदानही होणार आहे. हा प्रश्न देशाचा अंतर्गत असल्याची भुमिका हिंदुस्थानने मांडली आहे. तसेच युरोपीयन संसद या कायद्याची संपूर्ण माहिती घेऊन हिंदुस्थानशी चर्चा करेल अशी आशा आहे.

युरोपीयन संसदेत मांडलेल्या ठरावात असे म्हटल आहे की, CAA लागू झाल्यामुळे नागरिकत्व लागू करण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात. ज्यांच्याकडे नागरिकता नाही त्यांसंबंधित लोकांमुळे जगात मोठे संकट निर्माण होऊ शकते. असे मत युरोपीयन संसदेने व्यक्त केले आहे.

तर हा कायदा नागरिकत्व देण्यासंदर्भात आहे कोणाचेही नागरिकत्व काढण्यासाठी नाही अशी स्पष्ट भुमिका हिंदुस्थानने घेतली आहे. तसेच शेजारील राष्ट्रांमध्ये ज्या अल्पसंख्यांकांवर अन्याय अत्याचार झाला आहे, त्यांच्यासाठी हा कायदा असल्याचेही हिंदुस्थानने नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या