ब्रिटिश,निजाम यांच्या काळातही अशा घटना घडल्या नव्हत्या ; जाळपोळीनंतर जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षण आंदोलनात झालेल्या जाळपोळ, तोडफोडीच्या घटनांमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय, घर आणि दूध संघ पेटवून देण्यात आला होता. यामध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या संस्था ऑफिसला भेट देऊन प्रसारमाध्यमांशी चर्चा केली.

या संपूर्ण घटनेसंदर्भात संताप व्यक्त करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अतिरेक्यांनाही लाजवेल अशा घटना बीड शहरात घडल्या ज्या ब्रिटिशांनी निजाम काळातही घडल्या नव्हत्या. लोकांना घरामध्ये कोंडून जाळणे, अशा मानसिकतेच्या लोकांना अटक करून शासन झाले पाहिजे,अशी मागणी दत्त क्षीरसागर यांनी केली. तसेच मी या बीड जिल्ह्यातील घटना संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे देखील पत्रकार परिषदेत सांगितले आहे.