ईपीएफओचा प्रत्येक तिसरा क्लेम होतोय ‘रिजेक्ट’

epfo-pic

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफओला प्राप्त होणारा प्रत्येक तिसरा क्लेम नाकारला जात असल्याचे दिसून येत आहे. ईपीएफओच्या अधिकृत पोर्टलवर क्लेम सेटलबाबत कित्येक तक्रारी येत आहेत.

यासंदर्भात पेन्शन बॉडीने दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओच्या कार्यालयात क्लेम सादर केल्यास तो निकाली काढण्यात आणि पीएफची रक्कम मिळण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागतो. ईपीएफओमध्ये 277 मिलीयनपेक्षा जास्त खाती आणि जवळपास 20 लाख कोटींचे फंड आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षांतील क्लेम सेटलमेंटच्या आकडेवारीनुसार, 73.78 लाख दाव्यांपैकी 33.8 टक्के म्हणजेच 24.93 लाख दावे नाकारण्यात आले. अधिकृत आकडेवारीनुसार 44.66 लाख दावे निकाली काढण्यात आले आहेत आणि 2.18 लाख क्लोजिंग बॅलन्स म्हणून दाखवण्यात आले.

 2017-18 मध्ये ईपीएफओचे क्लेम नाकारण्याचे प्रमाण अनुक्रमे 13 टक्के आणि 18.2 टक्के होते. रिजेक्टेट क्लेमची आकडेवारी 2019-20 मध्ये 24.1 टक्के आणि 2020-21 मध्ये 30.8 टक्के होती. गेल्या काही वर्षांत फेटाळलेल्या दाव्यांचे प्रमाण वाढले आहे.

 सध्या 99 टक्के दावे हे ऑनलाइन पोर्टलमार्फत केले जात आहेत. अर्जदार ऑनलाइन दावा करताना  काही चुका झाल्यास दावा नाकारला जातो.