ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आलेल्या शासकीय पथकास परत पाठवले

रेणापुर तालुक्यातील कामखेडा येथे गुरूवार 22 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ईव्हीएम प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आलेल्या पथकास नागरिकांनी परत पाठवले. प्रात्यक्षिकास विरोध करीत मतदान पत्रिकेवरच कुठलीही निवडणूक घेण्याची मागणी करत आलेल्या पथकास परत पाठवले.

शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन वापरल्याने मतदानात फेरफार होत असल्याची शंका नागरिकात असल्याने गुरूवार दि.22 फेब्रुवारी रोजी सकाळी प्रशासनाचे पथक ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आले असता कामखेडा गावाबरोबर वाला, गरसुळी, तत्तापुर, फरदपुर, तांडा या गावातील नागरिकांनी ही ईव्हीएम प्रात्यक्षिकास विरोध करून मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे अशी मागणी करत शासकीय पथकास परत पाठवले.