20 जानेवारीपर्यंत ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करता येणार

तंत्रशिक्षण विभागांतर्गत विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱया उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, एनसीएल प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सीईटी सेलने 20 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. या उमेदवारांनी स्वतःच्या लॉगीनमधून ऑनलाइन पद्धतीने मूळ प्रमाणपत्र सादर करायची आहेत. प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सायंकाळी 5 वाजेपर्यंत असून त्यानंतर अशा उमेदवारांचा प्रथम फेरीतील प्रवेश रद्द करून त्यांना दुसऱया फेरीत खुल्या प्रवर्गातून पात्र ठरविण्यात येईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तसेच ज्या उमेदवारांनी या तीन प्रमाणपत्रांकरिता अर्ज केलेली पावती ऑनलाइन अर्ज करतेवेळी सादर केली आहे अशाच उमेदवारांना ही मुदतवाढ लागू असणार आहे, असे सीईटी सेलने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या