
लॉजवर वादाचे रूपांतर हाणामारी आणि नंतर जातिवाचक शिवीगाळीत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी महापौर मनोहर सपाटे व त्यांचे पुत्र बाबासाहेब सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर सपाटे यांच्यावर दुसऱयांदा ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनोहर सपाटे यांना अटक करण्यात आली असून, मुलगा बाबासाहेब पसार आहे.
फिर्यादी किरण साळवे हे शिव-पार्वती लॉजवर मॅनेजर आहेत. 13 ऑक्टोबर रोजी पहाटे लॉजमध्ये आलेल्या प्रकाशावरून साळवे व बाबासाहेब सपाटे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्याचवेळी बाबासाहेब सपाटे यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर किरण साळवे याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 14) बाबासाहेब सपाटे याच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला. या फिर्यादीत मनोहर सपाटे यांचेही नाव त्याने घेतले आहे. पोलिसांनी मनोहर सपाटे यांना अटक केली आहे.





























































