
मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महापौरांना लोअर परळ येथील पत्त्यावर आले आहे. या प्रकरणी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्यंत आक्षेपार्ह भाषेत महापौरांना धमकी देण्यात आली आहे. या पत्रात अजित पवार यांचाही उल्लेख आहे तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनाही ठार मारण्याची धमकी दिली आहे. पत्र विजेंद्र म्हात्रे या नावाने लिहिण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.






























































