माजी मंत्री जय नारायण व्यास यांनी दिला भाजपचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून गुजरातमध्ये राजकीय घडमोडींना केग आला आहे. त्यातच नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना मंत्रीपद भूषवलेले माजी आरोग्यमंत्री जय नारायण व्यास यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला आहे. व्यास हे आप किंवा कॉँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. व्यास मागील 30 वर्षांपासून भाजपमध्ये होते. या काळात त्यांना मोदी तसेच केशुभाई पटेल यांच्या मंत्रिमंडळात होते.