
सामना ऑनलाईन । जळगाव
जिल्ह्यातील माजी खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत गिरधर महाजन उर्फ वाय.जी. महाजन (वय 79) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. वाय.जी. सर या नावाने परिचित असलेले महाजन नशिराबाद येथील रहिवाशी होते. बी.ए.बी.एड. पर्यंत शिक्षण घेतलेल्या महाजन यांनी काही काळ शिक्षक म्हणून काम केले. जळगाव जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणुनही त्यांनी काम पाहीले. 13 व्या आणि 14 व्या लोकसभेत जळगाव मतदारसंघातुन खासदार म्हणुन वाय.जी. महाजन निवडून गेले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात त्यांनी विविध संसदीय समित्यांवर काम पाहीले. गेले काही दिवस आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई व त्यानंतर जळगावात खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. बोरगाव लेवा पंचायतीच्या सामाजीक कार्यातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.





























































