
माजी नौदल प्रमुख अॅडमिरल एल. रामदास यांचे आज शुक्रवारी निधन झाले आहे. सिकंदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते 90 वर्षांचे होते.
एल.रामदास 1990 ते 1993 दरम्यान देशाचे नौदल प्रमुख होते. वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ललिता रामदास आणि तीन मुली आहेत.






























































