परीक्षेला बसलेले विद्यार्थी निघाले कोरोना पॉझिटिव्ह, 600 पालकांविरुद्ध गुन्हे दाखल

1999

कोरोनाचा धोका गभीर बनला असताना परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या जीवितासाठी घातक आहे. त्यानंतरही केरळमध्ये इंजिनियरींग, आर्किटेक्चर, मेडिकलच्या परीक्षा घेतल्या गेल्या. त्या परीक्षांना बसलेले अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. इतर हजारो विद्यार्थ्यांच्या संपर्कात ते आल्याने त्यांनाही लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

केरळमध्ये विद्यार्थी-पालकांचा विरोध असतानाही इंजिनियरींग, आर्विâटेक्चर, मेडिकलच्या पूर्व परीक्षा घेतल्या गेल्या. त्या परीक्षेला बसलेले दोन विद्यार्थी मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते तर आज तिसऱ्या विद्याथ्र्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. हे समजल्यानंतर या परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची भीतीने गाळण उडाली आहे.

याच परीक्षांदरम्यान परीक्षा केंद्रांवरही बराच गोंधळ झाला. आपल्या मुलांना परीक्षेसाठी सोडायला आलेल्या पालकांची बरीच गर्दी झाली. त्यांना सोशल डिस्टन्सिंगही पाळणे कठीण झाले. त्या परिस्थितीचा काहीच विचार न करता सुमारे 600 पालकांवर सोशल डिस्टन्सिंग न पाळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. देशभरातून विरोध होत आहे. न्यायालयांमध्ये याचिका दाखल होत आहेत. इतका विरोध असतांनाही आपला आग्रह कायम ठेवलेल्या यूजीसीने केरळमधील या अनुभवातून धडा घ्यावा अशी प्रतिक्रिया पालकवर्गात व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या