
पालकची भाजी चविष्ट आणि आरोग्यवर्धक आहे. मात्र, ही गुणकारी असलेली पालकाची भाजी आता ई मलेद्वारे संदेशही पाठवू शकणार आहे. एखाद्या दंतकथेप्रमाणे ही बाब वाटेल. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनातून विशिष्ट पालकाची भाजी सांकेतिक भाषेतील सिग्नल पाठवण्यास सक्षम असल्याचे दिसून आले आहे.
या विशेष पालकाच्या भाजीकडून विस्फोटकांची माहिती मिळवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. सांकेतिक भाषेतील सिग्नल पाठवणाऱ्या पालकाच्या भाजीचा शोध संशोधकांनी लावला आहे. या संशोधनाचे प्रमुख संशोधक प्रोफेसर मायकल स्ट्रेनो यांनी सांगितले की, या रोपामध्ये उत्तम दर्जाचे रासायनिक गुणधर्म असतात. झाडांची मुळे जमिनीतील नेटवर्क सहजपणे मिळवू शकतात.
विशिष्ट प्रकारचा पालक ई-मेल पाठवून स्फोटकांबाबत संशोधकांना माहिती देणार आहे. अमेरिकेतील मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी हा विशेष प्रकारचा पालक तयार केला आहे. हा पालक सेंसरप्रमाणे काम करतो. तो जमिनीतील पाण्यातून नायट्रो एरोमॅटिक्स शोधून काढतो. पालकाशी संबंधित या संशोधनाला नायट्रो एरोमैटिक डिटेक्शन अॅण्ड इंफ्रारेड कम्युनिकेशन हे नाव देण्यात आले आहे.
पालकाच्या पानांमध्ये असलेले कार्बन नॅनोट्यूब नायट्रो एरोमॅटिक्सचा शोध लावून विशेष सिग्नल पाठवतात. हा सिग्नल इंफ्रारेड कॅमेऱ्याच्या मदतीने पकडता येतो. यामुळे वैज्ञानिकांना ईमेलच्या माध्यमातून स्फोटकांची माहिती मिळेल आणि योग्य त्या उपाययोजना करून संभाव्य हानी टाळता येणार आहे.
संशोधकांनी लावलेल्या या संशोधनाबाबत 2016 साली एका वैज्ञानिक जर्नलमध्ये याची माहिती प्रसिद्ध केली होती. मात्र, आता ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे. जमिनीतील पाणी आणि विशिष्ट सिग्नल रोपाच्या पानांपर्यंत पोहोचवण्याची शक्ती पालकांच्या मुळांमध्ये असते. त्यामुळे चे सिग्नल पालक ईमेलद्वारे सहज पोहचवणार आहे.
झाडे सजीव असून ती माणसांशी संवाद साधतात, असे याआधीच्या संशोधनातून दिसून आले होते. या संशोधनातून याला पुष्टी मिळाली असून संवाद साधण्यासाठी पालक हे महत्त्वाचे माध्यम ठरणार असल्याचे संशोधकांनी सांगितले. हेच या प्रयोगाचे वैशिष्ट्य आहे.































































