
सामना ऑनलाईन । अमरावती
आंध्र प्रदेशातील एक्सप्रेस टीव्ही या खासगी तेलुगू चॅनेलच्या मालकाचा संशयस्पद मृत्यू झाला आहे. चिगुरपति जयराम असे त्यांचे नाव असून ते कोस्टल बँकेचे कार्यकारी संचालक देखील होते. शुक्रवारी सकाळी जयराम यांचा मृतदेह राषट्रीय महामार्ग क्रमांक 65 वर कारमध्ये आढळला. तसेच त्यांच्या कारचा चालक देखील बेपत्ता आहे. आंध्रपदेशातील कृष्णा जिल्ह्यात वरील नंदिगाव येथे त्यांची कार रस्त्याच्या बाजूला बेवारस आढळली.
Andhra Pradesh: Jayaram Chigurupati, Director Coastal Bank and MD, Express TV (a Telugu channel) was found dead in a car late last night, on National Highway-65 near Nandigama Mandal, Krishna District. Police are probing the incident. pic.twitter.com/T5fVPtHrpa
— ANI (@ANI) February 1, 2019
जयराम यांचा मृत्यू अपघातामुळे झाला की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली आहे.



























































