
राज्यातील प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी 26 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पॉलिटेक्निकला अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजपर्यंत एकूण 1लाख 28 हजार 102 उमेदवारांनी नोंदणी केली असून, यापैकी 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा करून अर्ज सादर केले आहेत. विद्यार्थ्यांचा हा वाढता प्रतिसाद आणि प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा उशीर लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.