खंडणीखोर सराईत खान टोळीविरूद्ध मोक्का, चंदननगर परिसरात होती टोळीची दशहत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंदननगरमधील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून खंडणी वसूल करणार्‍या सराईत आसिफ खान याच्यासह टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरूद्ध दरोडा, खंडणी, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 114 वी कारवाई आहे.

आसेफ ऊर्फ आसिफ ईस्माईल खान (वय 23, टोळी प्रमुख) इरफान हसन भोला (वय 25 रा. जनता वसाहत पर्वती, मुळगाव- कर्नाटक) शहाबाज मेहमुद खान (वय 50) समीर मेहबुब शेख (वय 36) फरियाज हसनखान पठाण (वय 32 तिघेही रा. संतोषनगर कात्रज) आणि जॉन अशी मोक्कानुसार गुन्हा केलेल्यांची नावे आहेत.

सराईत आसिफ खान कोंढव्यातील राहणारा असून त्याने साथीदारांसह चंदननगर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. खराडीतील आय.टी. पार्कमधील कंपनीच्या मालकास धमकावुन खंडणी उकळली. बेकायदेशीर कृत्याप्रकरणी त्यांच्यावर पुणे, संभाजीनगर ग्रामीण हद्दीत गुन्हे दाखल आहेत. टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्यावतीने अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांना सादर केला. गुन्ह्याचा तपास एसीपी किशोर जाधव करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, एपीआय मनोहर सोनवणे, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, राजेश नवले, रामचंद्र गुरव, नाना पतुरे, सागर तारु, अनुप सांगळे यांनी केली.