असं झालं तर…अति मोबाईल वापरामुळे डोळ्यांना त्रास होतोय का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल आणि संगणकाच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना त्रास होतो.

थोडी काळजी घेतल्यास त्रास कमी होण्यास मदत होईल.

यासाठी 20-20-20 या नियमाचा अवलंबन करा.

दर 20 मिनिटांनी 20 सेकंदाचा ब्रेक घेऊन किमान 20 फूट लांबवर पहा.

डोळ्यांवरील ताण कमी होतो.

मोबाईल किंवा संगणकाची स्क्रीन आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर हे साधारणतः 20 ते 24 इंच असावे.

स्क्रीन थोडी तिरपी ठेवावी.

डोळ्यांवर ताण येणार नाही, असे स्क्रीनचे कॉन्ट्रास्ट आणि ब्राईटनेसचे सेटिंग ठेवा.

मोबाईलमध्ये ‘आय प्रोटेक्शन मोड’ ही सेटिंग ऑन करा.

स्क्रीनकडे पाहताना डोळे मिचकावत जा.

यामुळे डोळ्यांमध्ये ओलावा राहण्यास मदत मिळते.

अर्धा ते पाऊण तास काम केल्यानंतर डोळ्यांना 4-5 मिनिटे आराम द्या.